कालपरवापर्यंतचं आपल माणूस
आज जेव्हा अनोळखी होऊन जाता तेव्हा ।
ओळखीच्या काही खुणा जवळ बाळगतेच मी
खसखस घालून केलेली कारल्याची भाजी
तांदूळ घालून केलेली कांद्याच्या पातीची शेतकरी भाजी
कारवारी आमटी अन पांढरा रस्सा
वाहिनीनं केलेला ताजा मसाला घालून बनवलेला वांगीभात
अन गव्हाच्या रव्यात गूळ घालून केलेला शिरा
तुझ्या आईसाठी निवडून घेतलेली देशी केशरी-लाल सफरचंद
दसऱ्याच्या दिवशी बाजारात शोधलेल देशी मटण
दिवाळीला घरी तयार झाल्या झाल्या कुरिअर ने पाठवलेल्या चकल्या अन बेसनाचे लाडू
तुझ्या मित्राबरोबर पाठवलेल्या खव्याचा पोळ्या
तुला आवडणारे नाचणीचे लाडू
माझ्या घरी बोलाऊन तुला माझ्या हातची पुरणपोळी अन कटाची आमटी खाऊ घालायचा अधुऱचं राहिलेलं आमंत्रण
अन तुला सोडून परत जाताना बसस्टोप समोर मिळणारा कंदी पेढ्याचा पुडा
आपल्या घराभोवती चाफ्याचा झाड लावायचं
अन त्याभोवती मी चाफ्याच्या कविता म्हणणार ह्या स्वप्नाची मालकीण मी
अन देशी भाज्या फुलांच्या शेतीच्या आपल्या स्वप्नाचा मालक तू
नात तुटल; वगैरे सगळ ठीक आहे ….
पण तुझ: अनोळखी असण असहाय्य होत;
तेव्हा या खुणाच सोबत असतात
- अमृता बहुलेकर
नात तुटल; वगैरे सगळ ठीक आहे, पण तुझ: अनोळखी असण असहाय्य होत; तेव्हा या खुणाच सोबत असतात
ReplyDeletekhup chhan oli aahet ya... Thanks